स्मार्ट ग्राम ग्रामसंसद भवन
सिकंदरपूर  !

मौजे सिकंदरपूर हे गाव लातूर शहराच्या लगत दक्षिण बाजूला असून सदर गाव हे लातूर पासून 03 कि.मी. अंतरावर आहे.हे गाव लातूर शहर मतदार संघात असून या गावाची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणने प्रमाणे 1554 आहे.असून गावची कुटुंब संख्या 315 आहे.

सरपंच सौ.रेशमा माधव दादा गंभीरे यांना दिल्ली येथे १५ आॕगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रीत म्हणून निमंत्रीत..


ग्रामपंचायत विषयक

मौजे सिकंदरपूर हे गाव लातूर शहराच्या लगत दक्षिण बाजूला असून सदर गाव हे लातूर पासून 03 कि.मी. अंतरावर आहे.हे गाव लातूर शहर मतदार संघात असून या गावाची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणने प्रमाणे 1554 आहे.असून गावची कुटुंब संख्या 315 आहे. 
गावामध्ये भव्य असे ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रामार्फत सर्व नागरिकाना वेळेवर ऑनलाईन सुविधा दिल्या जातात व सर्व प्रकारचे दाखले दिले जातात.
गावामध्ये शेषेनाथ महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले अनुसया मातेचे जागृत देवस्थान आहे त्याच बरोबर हनुमानाचे,विठ्ठल रुक्मिणीचे,श्रीकृष्ण खाटू शाम मंदिर, एकलिंगेश्वर मंदिर व नृसिंह मंदिर असून वर्षाला आजूबाजूचे सर्व भाविक भक्त दर्शनाला येत असतात. 
गावातील स्मशानभूमीमध्ये मियावाकी वृक्ष लागवड केली असून त्यामध्ये 1475 वेगवेगळ्या प्रजातीची उंच जाणारी वृक्ष लावण्यात आलेली आहेत. तसेच अंतर्गतही 200 वृक्ष लावण्यात आलेली असून खूप निसर्गरम्य मध्ये वातावरण आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये मध्ये वृद्धाना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व हात धुण्यासाठी हॅन्ड स्टेशन बसवले आहे म्हणून बाहेरून येणारे अधिकारी मान्यवर याला वैकुंठ धाम असे संबोधित करत आहेत. 
तसेच गाव शहराच्या जवळ असल्याने नवीन वस्त्या जोमाने वाढत असून त्याठिकाणी अंतर्गत रस्त्यावर 5000 झाडे लावण्यात आलेली असून त्यामुळे गावाच्या सुंदरतेमध्ये भर पडलेली आहे. 
गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक घरी दोन कचरा कुंड्या एक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दिलेल्या असून सदरचा कचरा उचलण्यासाठी घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 
गावातील अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळा याची रंगरंगोटी करण्यात आलेली असून त्या बोलक्या अशा वाटतात. चौथी व पाचवीचा वर्ग डिजिटल असून विध्यार्थ्यांना बसण्यासाठी सुंदर बॅंचेस आहेत प्रोजेक्टर व स्पोकन इंग्रजी धडे शिकवण्यासाठी ग्राम संसदेने एका तज्ञ शिक्षकाची नियुक्ती केली आहे त्यामुळे शाळेतील विध्यार्थी अगदी आनंदाने शाळेमध्ये 100% उपस्थित राहून शाळेचे धडे घेतात.

ग्रामपंचायत विषयक साविस्तर तपशील :

ग्राम संसद सिकंदरपूर ची यशोगाथा

  • विशेष गौरव: तत्कालीन *मुख्यमंत्री उध्दव ठाकरे* यांनी कोरोना काळात गाव कोरोना मुक्त ठेवल्या बद्दल व गाव लातूर जिल्ह्यात सर्व प्रथम १००% लसीकरण केल्या बद्दल व नावीन्य पूर्ण उपक्रम राबवल्या बद्दल राज्यातील सरपंच संवाद कार्यक्रमात दुरदर्षप्रणाली कार्यक्रमात महिला सरपंचाचे कौतुक.
  •  राज्याचा पहिला 1 कोटी 75 लक्ष रुपयाचा पहिला पायलट प्रोजेक्ट मूलभूत सुविधेसह राबवून भटक्या जाती जमातील 44 लाभार्थ्यांना *यशवंतराव चव्हाण मुक्त वसात* घरकुल योजना राबवलेली ग्रामपंचायत
  •  सिकंदरपूर गावात दारू बंदी सह विविध नावीन्य पूर्ण उपक्रम राबवून महिलांना सन्मान केल्या बद्दल *राज्य स्तरीय महात्मा फुले समाज रत्न पुरस्काराने* मान्यवरांच्या हस्ते पुरकार देऊन सन्मानित करण्यात आले .
  •  ग्रामपंचायत सिकंदरपूरच्या महिला सरपंचांस *रयत प्रतिष्ठान* महाराष्ट्राच्या वतीने जिल्हा स्तरीय मानाच्या *ग्रामरत्न पुरस्काराने* मान्यवारंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  •  २५ महीला बचत गट करुन गावातच महीला बचत गटाची जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत प्रशिक्षण
  •  गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडीची सुरुवात.
  •  पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी १२७६ मिया वाकी वृक्ष लागवड .
  •  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचा वर्ग लोक सहभागातून डेक्स, प्रोजेक्टर सह डिजिटल केली.
  • बिहार पॅटर्न नुसार ८०० नारळाची लागवड
  •  शेतकर-यांच्या बांधावर ९०० फळांच्या वृक्षाची लागवड .
  •  २०२१ ते २०२३ या दोन वर्षात 3 कोटी रुपयांची विकास कामे .
  •  जनसुविधा, लोकसहभाग, रोजगार हमी योजनेतून सुसज्ज अत्याधुनिक ग्रामसंसद भवन निर्माण
  •  दोन वर्षात ११२ निराधार, विधवा, अपंग लोकांसाठी श्रावण बाळ योजनेतून मानधन
  •  दोन वर्षात ४४ घरकुल मंजूर
  •  रोजगार हमी योजनेतून शेतकर-यासाठी ३० गायीचे गोठे दुधाळ गट कडबा कुट्टी, बायोगॅस प्रकल्प राबवलेली ग्रामपंचायत
  •  रोजगार हमी योजनेतून 20 शेतकऱ्यांना सिचंन विहीर मंजूर करून फळबाग लागवड करून यस्वी केलेली ग्रामपंचायत
  •  गावातील महीला व पुरुषांचे मोफत शरीर तपासणी करून आरोग्य तंदुरुस्त ठेवणारी ग्रामपंचायत
  •  रोजगार हमी योजनेतून तीन वर्षात १५ किलोमीटर शिव रस्ते मजबुतीकरण, खाडिकरण करणारी ग्रामपंचायत
  •  जल जिवन जल मिशन अंतर्गत १ कोटी २२ लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना राबवणारी ग्रामपंचायत
  •  नवीन विस्तारित वस्ती मध्ये खडीकरण, मजबुती करण, पेवर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट डांबरीकरण रस्ते व नाली बांधकाम करणारी ग्राम संसद
  •  लोकसहभागातुन सुसज्ज सभागृह बांधणारी ग्राम संसद
  •  लोकसहभागातून हनुमान मंदिर ३५ फूट , विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३१ फुट , सती अनुसया माता मंदिर २५ फुट शिखर बांधकाम करणारी ग्राम संसद
  •  निरोगी आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छते वर विशेष काम करणारी ग्रामसंसद
  •  जेष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्र चालवणारी ग्राम संसद
  •  देशसेवा बजावून आलेल्या सैनिकांचे पाद्यपूजा करुन परिवाराचा सन्मान करणारी ग्राम संसद
  •  सर्व महिलांना मकर संक्रांतीला डस्टबिन , झाडू , वृक्ष देवून स्वच्छतेचे वान लुटनारी ग्रामसंसद
  •  १००% कर वसुली करणारी ग्रामसंसद
  •  महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी २५ महीला बचत गटाची स्थापना करुन गावातच महीलाना जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत प्रशिक्षण देऊन लघु उद्योग करणारी ग्रामसंसद
  •  गावातील घन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी मार्फत ओला कचरा व सुका कचरा विघटीकरण करुन कचरा संकलन करणारी ग्रामसंसद
  •  शमशानभूमीत पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी १२७६ मियावाकी वृक्ष लागवड करणारी ग्रामसंसद
  •  बिहार पॅटर्न नुसार ८०० नारळाची लागवड करणारी ग्रामसंसद
  •  शेतकर-यांच्या बांधावर ९०० फळांच्या वृक्षाची लागवड करणारी ग्रामसंसद
  •  रस्त्याच्या दुतरफा बिहार पॅटर्न प्रमाणे वृक्ष लागवड करणारी ग्राम संसद
  •  जि. प. शाळा, सार्वजनिक मंदिर, अंगणवाडी ग्रामपंचायत येथे रेन हार्वेस्टिंग करनारी ग्रामसंसद
  •  इ. सं. २०२१ ते २०२४ या वर्षात ५ कोटी रुपयांची विकास कामे करणारी ग्रामसंसद
  •  लोकसहभाग, ग्रामनिधी जणसुविधा तथा रोजगार हमी योजनेतून नवीन अध्यावत सुसज्ज ग्राम संसद भवनची निर्मिती करणारी ग्राम संसद
  •  साडेतीन वर्षात १९३ निराधार, विधवा, अपंग लोकांसाठी सं.गा. यो. इ.गा.यो. योजनेतून मानधन मंजूर करून घेणारी ग्राम संसद
  •  साडे तीन वर्षात प्रधान मंत्री घरकुल योजना व रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अहिल्यादेवी होळकर आवास घरकुल योजना, अटल बांधकाम आवास योजनाच्या माध्यमातून बेघर असलेल्या ११२ पात्र लाभार्थ्यांना लाभ देणारी ग्रामसंसद
  •  जुने गाव, वडार वस्ती, दलित वस्ती,नवीन वस्तीत १३१ खांबावर स्ट्रीट लाईट बसवणारी ग्राम संसद
  •  माजी वैदिकीय मंत्री, आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आमदार निधीतून हनुमान मंदिरासमोर सुसज्ज सभागृहाची निर्मिती करणारी ग्रामससंद
  •  ३० आर शमशनभूमीला संरक्षण भिंत बांधून वृक्ष लागवड करून सुशोभीकरण करणारी ग्रामससंद
  •  सुशिक्षित बेरोजगारांना वेगवेगळ्या महामंडळा कडून लाभ देऊन उद्योग धंदा निर्माण करणारी ग्रामससंद
  •  लोकसंख्येच्या दोन पट वृक्ष लागवड करणारी ग्रामसंसद
  •  जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्राम निधीतून स्पोकन व सेमी इंग्रजी साठी तज्ञ शिक्षक नेमून इंग्रजीचे शिक्षण देणारी ग्राम संसद
  •  सिकंदरपूर येथील गरीब परिवारात जन्मलेल्या मुलींना लेक वाचवा लेक शिकवा अभियानातून मदत करणारी ग्राम संसद
  •  देशसेवा बजावून आलेल्या गावातील सैनिकांची भव्य मिरवणूक काढून पाद्यपूजन करत त्यांचा व त्यांच्या परिवाराचा सन्मान करणारी ग्रामससंद
  •  इ. स.२०२२-२३ वर्षात सिकंदरपूर येथे १००% कर वसुली केल्या बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व पंचायत समिती लातूरचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या कडून सन्मान पत्र देऊन सन्मान प्राप्त करणारी ग्राम संसद
  •  सरपंच सौ. रेशमा माधव गंभीरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १०५ विध्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा केला

सरपंच सौ. रेश्मा माधव गंभीरे

2021 वर्षा पासुन आजतागायत ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने या कालावधीमध्ये “ महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जनसुविधा योजनाचे अभिसरून करुन लातूर जिल्ह्यातील सिकंदरपूर येथे निर्मिती केलेल्या ग्राम संसद भवनचा पायलट प्रकल्प असेल, तसेच कमी कालावधीत आदर्श गावच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प, स्मार्ट विल्हेज पुरस्कार तसेच, संत गाडगे महाराज स्वचतेचा जिल्हा, विभाग स्तरीय पुरस्काराचा बहुमान मिळवत स्तनदा मातांना बसण्याचा आरामदायी कक्ष, बोलकी शाळा बोलकी अंगणवाडी, सौर ऊर्जा ग्रामससंद , पेपरलेस ग्रामससंद , रेंनहार्वेस्टिंग प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, वैकुंठधाम शमशान भूमीत मिया वाकी वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न प्रमाणे वृक्ष लागवड व व्यवस्थित संगोपन, घंटागाडीच्या माध्यमातूनओला व व सुका कचरा व्यवस्थापन, हात धुण्यासाठी हॅन्ड स्टेशन, स्वच्छ आरो प्लांट पाणी व्यवस्थापन, शेतकऱ्यांना मोफत जनावराचे दाखले, रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना गायीचे गोठे, निराधार, अपंग, विधवा, महिला यांना मानधन योजना, महिला बचत गट यांची कार्यशाळा व रोजगार निर्मिती , शेतकरी- पुरुष बचत गट, बालविवाह बंदी कायदा अमलबजावणी , गावात दारूबंदी , कुपोषण , विध्यार्थी, शेतकरी – शेतमजूर, जेष्ठ नागरिकांसाठी पारदर्शक पद्धतीने योजना राबविण्यात येत असलेल्या अनेक नावीन्य पूर्ण उप्रक्रम राबवल्यामुळे..

  • संत गाडगे बाबा स्वछता 2022-23 जिल्हा स्तरीय पुरस्कार
  • संत गाडगे बाबा स्वछता विशेष पुरस्कार 2022-23
  • महात्मा ज्योतिबा फुले ग्रामरत्न पुरस्कार
  • ज़िल्हा परिषदेचा कर वसुली पुरस्कार
  • रयत प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जिल्हा स्तरीय ग्राम रत्न पुरस्कार
  • अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फॉउंडेशन कोल्हापूर चा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार आशा विविध संस्थेचे पुरस्कार सरपंच रेशमा गंभीरे व सिकंदरपूर ग्राम संसदेस प्राप्त झाले आहेत

वृक्ष लागवड

पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणारी ग्रामसंसद.

कर वसुली विशेष मोहिम..

१००% कर वसुली करणारी ग्रामसंसद

जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट .

जिल्हाधिकारी वर्षा घुले ठाकूर यांनी सिकंदरपूर येथे साकारण्यात आलेल्या नूतन ग्राम संसद भवन ची पहाणी करून समाधान व्यक्त केले


आमच्या सेवा

विविध दाखले

ग्रामपंचायत मधून देण्यात येणारे विविध दाखले

ग्रा.प.शी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी सेवा

बँकिंग सुविधा, रिचार्ज,रेल्वे/बस आरक्षण,पॅनकार्ड ,आधारकार्ड,विज बील भरणा,ई.

ग्रामपंचायतीचा जमा – खर्च

ग्रामपंचायतीचा जमा – खर्च.

तहसील कार्यालयाशी संबंधित सेवा

उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र,जातीचा दाखला ई.


विशेष गौरव!

ग्रामरत्न पुरस्कार :

ग्रामपंचायत सिकंदरपूरच्या महिला सरपंचांस *रयत प्रतिष्ठान* महाराष्ट्राच्या वतीने जिल्हा स्तरीय मानाच्या *ग्रामरत्न पुरस्काराने* मान्यवारंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


वर्त्तपत्रांनी घेतलेली दखल.


विविध संकेतस्थळ 

जिल्हा परिषद लातुर

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे

जिल्हाधिकारी कार्यालय ,लातुर

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर. छायाचित्र उपलब्ध नाही, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, 02382-224201

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा ‘मनरेगा’ असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट ‘कामाच्या अधिकाराची हमी’ देणे आहे

सिकंदरपूर गावात हाती घेतलेल्या परिवर्तनाच्या उपक्रमांमुळे मी खूप प्रभावित झालीआहे. ग्रामसंसदेचा पथदर्शी प्रकल्प आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना व सार्वजनिक सुविधा योजनेंतर्गत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. सौरऊर्जा, पेपरलेस वर्क, ऑनलाइन प्लॉट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस प्रकल्प आणि घंटागाडी मार्गे कचरा व्यवस्थापन यासह नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह गावाने एक अनुकरणीय मानक स्थापित केले आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत पशु प्रमाणपत्र, गुरेढोरे, निराधार, अपंग आणि विधवांसाठी आधार तसेच महिला आणि पुरुषांच्या बचत गटांना सर्वसमावेशकता आणि सामुदायिक कल्याणासाठी वचनबद्धता दर्शवते.
शिवाय, बालविवाहावर बंदी, दारू बंदी, कुपोषण सोडवणे आणि विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पारदर्शक उपक्रम हे विकासासाठी एक अग्रेसर आणि सर्वांगीण दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात. ग्रामपंचायतीचे ग्रामसंसद आणि ग्राम स्मशानभूमीचे वैकुंठ धाम असे नामांतर हा एक वैचारिक स्पर्श आहे जो प्रगतीचा स्वीकार करताना परंपरेचा सन्मान करते.
मी विशेषतः सीड बँक, सीड बॉल, ग्राम संसद रोपवाटिका प्रकल्प आणि मियावाकी 1676 वृक्ष लागवड प्रकल्पामुळे खूश आहे. समाजाचा, विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे.
सिकंदरपूर गाव हे शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे. मी नेतृत्व आणि सहयोगी भावनेची प्रशंसा करतो ज्यामुळे हे यश शक्य झाले आहे..

मा.वर्षा ठाकूर-घुगे I.A.S जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, लातूर

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..

ग्राम संसद भवन सिकंदरपूर, तालुका, जिल्हा : लातूर
पिन कोड : 413531

सफाई को अपनाना है, भारत स्वच्छ बनाना है!

Scroll to Top